Home मनोरंजन ‘तुझा धर्म कोणता?’ असा प्रश्न विचारणाऱ्या युझरला बाबिल खानचं सडेतोड उत्तर

‘तुझा धर्म कोणता?’ असा प्रश्न विचारणाऱ्या युझरला बाबिल खानचं सडेतोड उत्तर

0
‘तुझा धर्म कोणता?’ असा प्रश्न विचारणाऱ्या युझरला बाबिल खानचं सडेतोड उत्तर

[ad_1]

हायलाइट्स:

  • दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सोशल मीडियावर असतो चर्चेत
  • एका युझरनं बाबिलला विचारल्या त्याच्या धर्मासंबंधी प्रश्न
  • युझरच्या प्रश्नाला बाबिल खाननं दिलं सडेतोड उत्तर

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरलही होतात. याशिवाय अनेकदा तो ट्रोलर्सना देखील तो सडेतोड उत्तर देताना दिसतो. नुकतंच एका युझरनं बाबिलला त्याच्या धर्माबाबत प्रश्न विचारला. ज्याकडे दुर्लक्ष न करता बाबिलनं त्याला उत्तर दिलं. सध्या सोशल मीडियावर बाबिलच्या या वागण्याचं कौतुक केलं जात आहे. तसेच त्यानं जे उत्तर दिलं त्याचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करताना एका युझरनं बाबिलला, ‘तू मुस्लीम आहेस का?’ असा प्रश्न विचारला. ज्यात उत्तर देताना आपण कोणत्याही धर्माचे नसल्याचं बाबिलनं सांगितलं. या युझरला उत्तर देताना बाबिल म्हणाला, ‘मी बाबिल आहे.’ याशिवाय या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘मी बायबल, भगवत गीता आणि कुराण वाचलं आहे. सध्या गुरू ग्रंथ साहिब वाचत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो.’ बाबिलच्या उत्तराचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.

AssignmentImage-46919306-1625920719

इरफान खान यांच्या निधनानंतर बाबिल नेहमीच त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होता. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यानं पोस्ट शेअर करणं बंद केलं होतं. जेव्हा एका चाहत्यानं याचं कारण विचारलं तेव्हा त्याला उत्तर देताना बाबिल म्हणाला, ‘काही लोकांना वाटतं की, मी अशाप्रकारे पोस्ट शेअर करून स्वतःचं प्रमोशन करत आहे. या गोष्टीचं मला दुःख झालं. ज्यामुळे मी अशा प्रकारे पोस्ट करण बंद केलं. पण योग्य वेळी आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी त्यांच्याबद्दल नक्की पोस्ट करेन.’


बाबिलच्या कामाबद्दल बोलायचं तर तर तो लवकरच ‘काला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्माचं प्रोडक्शन हाऊस करत आहे. या चित्रपटात बाबिल खानसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



[ad_2]

Source link