Home शहरे मुंबई गंभीर दम्‍यावरील उपचारासाठी भारतातील पहिली अलायर यंत्रणा नवी मुंबईत सुरू

गंभीर दम्‍यावरील उपचारासाठी भारतातील पहिली अलायर यंत्रणा नवी मुंबईत सुरू

 दम्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी रूग्णांसाठी आता आशेचा मोठा किरण नवी दिसून आला आहे. वाशी येथील फोर्टीस सहयोगी ह़ॉस्पीटल हिरानंदानी हॉस्पीटलमध्ये ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी उपचार देण्यासाठी अलायर यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रेस्पीरेटरी मेडीसीन व इंटरवेन्शल पल्मनोलॉजीस्टचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत छाजेड यांच्यासह वाशी येथील फोर्टीस सहयोगी हॉस्पीटल हिरानंदानी हॉस्पीटलचे फॅसिलीटी डायरेक्टर संदीप गुदुरू यानी या यंत्रणेचे उदघाटन केले.

अलायर यंत्रणेच्‍या खरेदीबाबत बोलताना वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्‍टर श्रीसंदीप गुदुरू म्‍हणाले, आम्‍हाला ब्रोन्कियलथर्मोप्‍लास्‍टी यंत्रणा खरेदी केलेले पश्चिम भारतातील पहिले हॉस्पिटल असण्‍याचा आनंद होत आहे. ही यंत्रणा गंभीर दम्‍याने पीडित असलेल्‍या रूग्‍णांना साह्य करेल.

भारतीय प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये दम्‍याचे प्रमाण २ टक्‍के आहे आणि जवळपास  २ दशलक्ष भारतीय प्रौढ व्‍यक्‍ती गंभीर दम्‍यापासून पीडित असल्‍याचा अंदाज आहे. दम्‍यावर नियंत्रण नराहण्‍यासाठी जबाबदार असलेले घटक ओळखून त्‍यानुसार उपचार करण्‍याकरिता गंभीर दम्‍याने पीडित असलेल्‍या रूग्‍णांची सखोल तपासणी केली जाते. त्‍यानंतर अशा रूग्‍णांवरब्रोन्कियल थर्मोप्‍लास्‍टी केली जाते. ही प्रक्रिया ब्रोन्कियल स्‍नायू आंकुचित करून दमा नियंत्रण सुधारण्‍यासाठी रेडिओफ्रिक्‍वेन्‍सी नियंत्रित ऊर्जेचा वापर करते. ही प्रक्रिया दोन ते तीनआठवड्यांमध्‍ये तीन वेगवेगळ्या सत्रांमध्‍ये तोंडावाटे किंवा नाकावाटे टाकल्‍या जाणा-या ब्रोन्‍कोस्‍कोपच्‍या माध्‍यमातून केली जाते. अलायर यंत्रणेच्‍या माध्‍यमातून अतिरिक्‍त श्‍वसन स्‍नायूऊतींवर सौम्‍य उष्‍णतेचा मारा दिला जातो. ब्रोन्कियल थर्मोप्‍लास्‍टी उपचार होत असताना इनहेलर्स आणि इतर औषधांची देखील गरज भासते. पण त्‍यांचे डोसेज आणि वापरआवश्‍यकतेनुसार कमी करता येऊ शकतात. प्रक्रियेनंतर काही दम्‍याचे झटके येऊ शकतात. त्‍यासाठी काही दिवस हॉस्पिटलमध्‍ये राहावे लागू शकते. तर काहीजण आपापल्‍या दैनंदिनकामांवर रुजू देखील होऊ शकतात.  

अधिक माहितीकरिता संपर्क साधा:

फोर्टिस हेल्‍थकेअर लि.मॅडिसन पीआर
अजेय महाराज [email protected]प्रिया बेंद्रे – 77385 [email protected]डेझरी क्रास्‍टो – 98195 [email protected]प्रियंका शर्मा </b