मेस्सी विरुद्ध नेमार अर्जेंटिनाच्या मोठ्या जेतेपदात आपला सहभाग असावा, असे लिओनेल मेस्सीचे ध्येय आहे. याआधी त्याला अशी संधीही खूप वेळा मिळाली; पण पदरी उपविजेतेपदाशिवाय दुसरे काहीच पडले नाही. मेस्सी चौथ्यांदा कोपाच्या फायनलमध्ये खेळणार आहे. २०१४च्या वर्ल्ड कपमध्येही मेस्सीच्या अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ३४ वर्षीय मेस्सीने चार गोल केले असून, पाच गोलला साह्य केले आहे. २०१९मध्ये ब्राझीलने पेरूला १-० असे नमवून कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. मात्र, त्या वेळी दुखापतीमुळे नेमार खेळू शकला नव्हता. त्यामुळे दोघांचे लक्ष्य संघाला जेतेपद मिळवून देण्याचे असेल.
वाचा- सूर्यकुमार यादवच्या ऑल टाइम IPL संघात भारताचा हा दिग्गज खेळाडू नाही
खेळ आकड्यांचा
१४ – अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा चौदा वेळा जिंकली आहे. अर्जेंटिनाने अखेरचे जेतेपद १९९३मध्ये मिळविले आहे.
९ – ब्राझीलने ही स्पर्धा नऊ वेळा जिंकली आहे. सलग दुसरे जेतेपद मिळविण्याची ब्राझीलला संधी आहे.
वाचा- Video: रिचाच्या स्टंपिंगपुढे धोनी देखील काहीच नाही; विजेच्या वेगाने फलंदाजाला बाद केले
जमेची बाजू :
अर्जेंटिना – कर्णधार मेस्सी चांगल्या फॉर्मात आहे. एमिलिनो मार्टिनेझसारखा कसलेला गोलकीपर संघात. लॉटारो मार्टिनेझ, गोमेझ, डी पॉल, पेझ्झेला, मोलिना, रॉड्रिग्ज, गोन्झालेझसारखे खेळाडू संघात. दुसरी फळीही मजबूत.
वाचा- Video: तो बाहेरचा बॉल जाऊ दे…; गावस्कारांना शुभेच्छा देताना सचिनने उघडला आठवणींचा खजिना
ब्राझील – घरच्या मैदानावर लढत. ब्राझीलचे खेळाडू चांगल्या लयमध्ये आहेत. नेमारने स्पर्धेत दोन गोल केले आहेत. पॅक्वेटा, एव्हरटन, फ्रेड, कॅसेमिरो, लोदी, सिल्वा, डॅनिलो, रिचर्लिसनसह राखीव फळीही मजबूत.
जागतिक क्रमवारी ३ – ब्राझील ८ – अर्जेंटिना
स्थळ : मराकाना स्टेडियम, ब्राझील वेळ : रविवारी, पहाटे ५.३० पासून (भारतीय प्रमाणवेळ)
आमने सामने १११ लढती ४६ ब्राझीलचे विजय ४० अर्जेंटिनाचे विजय २५ बरोबरी