गेटमधून आतमध्ये आल्यानंतर चाहत्याने जान्हवीला त्याने आलेले मोठे गिफ्ट दिले. तिच्यासोबत फोटो काढला. जान्हवीने त्याने आणलेल्या गिफ्टचा स्वीकार केला ते उघडून पाहिले आणि गाडीत बसून निघून गेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय म्हणाले युझर्स
जान्हवीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवीवर युझर्सने टीका करायला सुरुवात केली. कारण या चाहत्यासोबत वागताना जान्हवी अॅटिट्यूड दाखवत होती. ही गोष्ट अनेकांना खटकल्याने त्यांनी जान्हवीवर टीका करायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले, ‘ही इतकी उद्धटपणे काम वागत आहे. हिला अभिनय तर येत नाही…’ आणखी एका युझरने लिहिले की, ‘आताच इतका अॅटिट्यूड आहे हिला…’ चाहत्याने दिलेले गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर जान्हवीने त्याचे रॅपर तिथेच टाकून दिले होते. त्यामुळेही तिच्यावर टीका झाली. एका युझरने लिहिले, ‘सुशिक्षित पण असभ्य व्यक्ती.’
दरम्यान, जान्हवीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर तिचा ‘रुही’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा होते. आता जान्हवी ‘ दोस्ताना २’, ‘तख्त’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.