रिओ दि जानेरो : 2007, 2015 आणि 2016 या तीन वर्षात दोन गोष्टींचं साम्य आहे. पहिली लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेटिना कोपा अमेरिकेच्या फायनलपर्यंत पोहोचली, पण जिंकू शकली नाही. आणि दुसरी म्हणजे या सर्व फायनल्समध्ये एमिलियानो मार्टिनेज नव्हता. मार्टिनेज हा तोच गोलकीपर आहे, ज्यानं मेस्सीचं नशिब बदललं. गोलपोस्टची भिंत, जी नेमार आणि त्याच्या ब्राझीलच्या संघाला भेदता आली नाही. आणि अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवून जेतेपद जिंकलं. मार्टिनेजला गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार मिळाला.
अशी बदलली मेस्सीची कहाणी
मेस्सीच्या नेतृत्वात मार्टिनेजने अर्जेंटिनाच्या विजयाची कथा लिहून काढली. पदार्पणाच्या 38 दिवसांतच तो सुपरस्टार बनलाय. त्याच्या या दमदार कामगिरीबद्दल त्याला गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार जिंकणारा तो अर्जेंटिनाचा पहिला गोलकीपर ठरला आहे. मार्टिनेजने 4 पेनल्टी वाचविल्या त्यापैकी 3 पेनल्टी या कोलंबियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील होत्या. तसेच त्याने 4 गोलही वाचवले. त्यामध्ये फायनलमधील एका गोलचा समावेश आहे. मार्टिनेजची लहानशी चूक अर्जेंटिनासाठी स्वप्न भंग करणारी ठरली असती.
मार्टिनेज हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वातील फार जुनं नाव नाहीय. फक्त 38 दिवसांपूर्वीचं त्यानं अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. मार्टिनेजने 3 जून 2021 रोजी चिलीविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यात पहिल्यांदा अर्जेटिनाची जर्सी घातली. यानंतर त्याने गोलपोस्टवर दाखवलेली तत्परता जग पाहात राहिले. कोलंबियाविरूद्धच्या पेनल्टी शूटआऊटनंतर तो नायक बनला.

नेमारला भेदता आला नाही किल्ला
1993 पासून चालत आलेला जेतेपदाचा दुष्काळ अर्जेंटिनाने संपवला. ब्राझीलविरुद्धच्या या सामन्यात मारियोने 22 व्या मिनिटाला गोल केला. या पूर्ण टूर्नामेंटमध्ये ब्राझीलवर झालेला हा तिसरा गोल ठरला. जगातील सर्वोत्तम स्ट्रायकर आणि मेस्सीचा साथीदार असलेल्या नेमारला सामन्यात गोलची संधी होती. त्याने ब्राझीलला एका सुंदर ड्रिबल आणि पासने बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला, पण अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलोयानो मार्टिनेजसमोर ही जादू चालली नाही. कोच टिटेच्या ब्राझील संघाने कोपा अमेरिकेच्या गेल्या पाच सामन्यात गोल केले होते आणि सामनेही जिंकले होते.
- Advertisement -