हायलाइट्स:
- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं लावली विम्बलडन महिला एकेरीच्या अंतिम सामन्याला हजेरी
- सोशल मीडियावर प्रियांका चोप्राचे फोटो होत आहेत व्हायरल
- विम्बलडन २०२१ अंतिम सामन्यांच्या वेळी टॉम क्रुझच्या गर्लफ्रेंडवर खिळल्या सर्वांच्या नजरा
प्रियांका चोप्रा आणि नताशा पूनावाला यांनी अॅशले बार्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोवा यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचा आनंद घेतला. हा सामना अॅशले बार्टीने कॅरोलिना प्लिस्कोवाला ६-३, ६-७, ६-३ असं हरवत जिंकला आणि विम्बलडन टेनिस ग्रँडस्लॅम ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. अॅशलेचं दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
अभिनय क्षेत्रातून प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त या सामन्यासाठी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझनंही हजेरी लावली होती. याशिवाय ब्रिटन राजघराण्यातून केट मिडलटन, प्रिन्स विलियमही या ठीकाणी उपस्थित होते. प्रियांका चोप्रानं या सामन्याच्या वेळचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियांकाच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, ‘अप्रतिम खेळी! अॅशले बार्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोवा दोघींनाही शुभेच्छा.’
एकीकडे प्रियांका चोप्रा आणि नाताशा पुनावाला यांच्या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होत असतानाच दुसरीकडे सुपरस्टार टॉम क्रुझ आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे विम्बलडनमधील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. टॉमन या सामन्यांना कथित गर्लफ्रेंड हेले एटवेलसोबत हजेरी लावली होती. विम्बलडनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून या दोघांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.