हायलाइट्स:
- आराध्या बच्चनचे व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
- आराध्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना झाली ऐश्वर्याची आठवण
- अनेकदा आराध्यामुळे ऐश्वर्याला सोशल मीडियावर व्हावं लागलंय ट्रोल
श्यामक डावरच्या समरफंक शोमधील आराध्याच्या डान्स परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती पिंक ड्रेसमध्ये धम्माल डान्स करताना दिसत आहे. यावेळा आराध्याला चिअर करण्यासाठी तिची संपूर्ण फॅमिली उपस्थित असलेली दिसत आहे. यामध्ये आराध्याच्या डान्स मूव्ह्स उत्तम आहेत आणि त्यासोबत प्रॉप्सच्या वापरही अगदी चांगल्या प्रकारे करताना दिसत आहे. आराध्याचा डान्स पाहून तिचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
याशिवाय आराध्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती महिला सबलीकरणावर भाषण देताना दिसत आहे. आराध्याचा हा व्हिडीओ तिची आत्या श्वेता बच्चन रेकॉर्ड करताना दिसत आहे. याशिवाय शाहरुख खान आणि आणखी काही व्यक्ती आराध्याचं हे भाषण व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.
आराध्याच्या भाषणाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्याच्या तिची आई ऐश्वर्यानं मिस वर्ल्डच्या मंचावर दिलेल्या उत्तराची आठवण झाली आहे. तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं तिनं पूर्ण आत्मविश्वासात उत्तर दिलं होतं. त्यामुळे आराध्याला अशाप्रकारे भाषण देताना पाहून चाहत्यांना ऐश्वर्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान ऐश्वर्या रायला आराध्याची अती काळजी करत असल्याच्या कारणानं अनेकदा ट्रोल केलं जातं.