Home ताज्या बातम्या Maharashtra Rain Live Update:रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Live Update:रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
Maharashtra Rain Live Update:रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईः तळकोकणात रविवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाले भरून वाहू लागल्याने सोमवारी संगमेश्वर, माखजन, लांजा, राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अर्जुना व कोदवली नदीला पूर आला असून राजापूर शहरामध्ये पाणी घुसले. राजापूर बाजारपेठ व गुजराळी यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्हीकडील भागांचा संपर्क तुटला आहे. तर, रत्नागिरीत आज मंगळवारीही पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक भागात रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. (Maharashtra Rain Live Update)

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी,Heavy rains in Maharashtra, IMD issues red alert in raigad, ratnagiri कोल्हापूर, सातारा येथे घाट भागांसाठी सुधारित इशाऱ्यानुसार मंगळवारी ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. सिंधुदुर्गातही ‘ऑरेंज अॅलर्ट’ कायम आहे. मंगळवारी मुंबईला दिलेला ‘ऑरेंज अॅलर्ट’ मागे घेऊन तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला. ठाण्यासाठी दिलेला अॅलर्ट मागे घेण्यात आला आहे. मात्र पालघरचा ‘ऑरेंज अॅलर्ट’ कायम आहे

Live Update

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थिती नियंत्रणात

– पुढील तीन तासांत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात मध्यम ते अति तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज

– रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

– लांजाः काजळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळं तालुक्यातील दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

– राजापूरमध्ये पावसाचा कहर; मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल केला वाहतुकीसाठी बंद

Source link