Home अश्रेणीबद्ध नागरिकांचे समाधान – त्यातच आमचा मोठेपणा अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांचे प्रतिपादन

नागरिकांचे समाधान – त्यातच आमचा मोठेपणा अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांचे प्रतिपादन

पुणे: नागरिकांचे समाधान
त्यातच आमचा मोठेपणा असल्याचे अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी पत्रकार परिषदेत म्हणाले. पुणे पोलिसांकडून मध्यवर्ती सेवा कार्यप्रणालीची सुरवात दि. १ सप्टेंबर २०१८ कार्यरत झाली आहे. यात एकूण अभ्यागतांची संख्या १ लाख ९ हजार २६४ आहे. तसेच सेवा कार्यप्रणालीकडून १ लाख १ हजार ४२ अभ्यागत समाधानी आहेत. संपर्क न झालेले केवळ ४ हजार ९६ आहेत. सेवा कार्यप्रणालीकडूनच्या कॉलमधून असमाधानी असलेले फक्त ३२ लोकं आहेत.
यात असमाधानी अभ्यागतांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचेकडून पूर्तता करून घेत आहेत. असमाधानी व्यक्तींची तक्रार इतर विभागांशी संबंधित असून त्यात कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालय, मनपा, महसुल बांधकाम विभाग महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांचा समावेश होतो. तसेच सेवा कार्यप्रणालीकडून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे आगमन प्रस्थानच्या बदललेल्या वाहतुकींबाबत १ लाख नागरिकांना एसएमएस केले असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.