हायलाइट्स:
- अभिनेता राम कपूरने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार
- पोर्शे कंपनीने इन्स्टाग्रामवरून शेअर केली पोस्ट
- राम कपूरच्या चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
राम कपूरने नुकतीच ‘पोर्श ९११’ ही आलिशान आणि महागडी अशी स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. रामने खरेदी केलेल्या या कारची किंमत १.८३ कोटी इतकी आहे. पोर्शे या कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राम आणि त्याच्या कुटुंबियांचे कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘ही राम कपूर यांची आलिशान गाडी. मुंबईतील आमच्या शोरूममधून ही गाडी राम यांना देण्यात आली. या गाडीमधून ते आनंदी आणि सुखी प्रवास करतील अशी आशा आहे.’ या फोटोमध्ये राम यांच्यासोबत पोर्शे कंपनीच्या मुंबईतील शोरूममधील काही कर्मचारी दिसत आहे. या पोस्टला कमेंट करून रामच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
राम कपूर उडान, थप्पड, बिग बूल या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले. ‘कसमसे’ आणि ‘बडे अच्छे लगते है’ या सिरीअलमधील रामच्या भूमिकांना प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळाले आहे.
रामने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी काही सलमान खान शाहरूख खान यांच्यासारखा प्रसिद्ध अभिनेता नाही. परंतु सिरीअलमधून जी लोकप्रियता मिळवली आहे त्यामुळे देशाच्या कानाकोप-यातील अनेकजण मला ओळखतात. मला वाटते की मालिकांमध्ये काम करा किंवा चित्रपटांमध्ये जर तुमचा अभिनय चोख असेल तर तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळतेच.’