हायलाइट्स:
- रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच होते चर्चा
- रणबीर- आलियाच्या लग्नाबाबत अभिनेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य
- सोशल मीडियावरून होतेय अभिनेत्यावर जोरदार टीका
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर टीका करणारा अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खाननं आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अजब भविष्यवाणी केली आहे. अर्थात या भविष्यवाणीमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोलही केलं जात आहे. केआरकेनं त्याच्या ट्वीटमध्ये आलिया- रणबीरच्या लग्नाबाबत अंदाज लावला आहे. एवढंच नाही तर या दोघांचं घटस्फोटही होणार असल्याचं म्हटलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांबद्दल भविष्यवाणी करताना दिसत आहे. अशात त्यानं आता आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाबाबत एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं लिहिलं, ‘रणबीर आणि आलिया पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२च्या अखेरीपर्यत लग्न करतील. पण फार वर्ष त्यांचं लग्न टिकणार नाही. १५ वर्षांच्या आतच त्यांचा घटस्फोटही होईल.’
केआरकेच्या या ट्वीटनंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चाहत्यांनी मात्र त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. केआरकेच्या या भविष्यवाणीवर त्यांनी राग व्यक्त केला आहे. एका युझरनं केआरकेच्या ट्वीटवर कमेंट करताना लिहिलं, ‘प्रभू, तुम्ही महान आहात… सांगा माझं पण लग्न आणि घटस्फोट कधी होणार?’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘तू नेहमी सर्वांबद्दल वाईटच का बोलत असतो. कधी कोणाबद्दल चांगलं बोलू शकत नाही का?’
दरम्यान काही दिवसांपूर्वीच केआरकेनं अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाबद्दलही अशीच भविष्यवाणी केली होती. निक जोनस पुढच्या १० वर्षांत प्रियांकाला घटस्फोट देईल असं त्यानं आपल्या भविष्यवाणीच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.