[ad_1]
हायलाइट्स:
- फेब्रुवारी महिन्यात वैभव रेखी सोबत केला होता विवाह
- दियाला झालाय पुत्ररत्नाचा लाभ परंतु दोन महिन्यांपासून आयसीयूत आहे बाळ
- पोस्ट शेअर करत दियाने दिली माहिती
दियाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी दिली. परंतु, त्यासोबतच पोस्ट लिहित दियाने म्हटलं की, तिच्या मुलाचा जन्म १४ मे रोजी झाला आहे. परंतु, वेळेच्याआधी जन्मल्यामुळे गेले दोन महिने त्याला आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. दियाने लिहिलं, ‘माझ्या गरोदरपणात निर्माण झालेल्या काही अडचणींमुळे डॉक्टरांनी वेळेआधीच ऑपरेशन करून माझ्या मुलाला जीवन दिलं. मी त्या सगळ्यांची आभारी आहे. मी त्यांचेदेखील आभार मानते ज्यांनी या कठीण प्रसंगात कायम मला मदत केली. आमच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी आहे. त्याचे आजी- आजोबा त्याला कुशीत घेण्यासाठी व्याकुळ झाले आहेत.’
या पोस्टसोबत दियाने काही फोटो शेअर करत आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद व्यक्त केला. सोबत त्याच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. दियाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबतच चाहते दियाच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.
[ad_2]
Source link