काय आहे व्हिडीओमध्ये
सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला विम्बलडन फायनल सुरू असलेल्या स्टेडिअममध्ये जेव्हा केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम या शाही दाम्पत्याने एन्ट्री केली. त्यावेळी प्रत्येकजण टाळ्या वाजवत उत्साहात त्यांचे स्वागत करताना दिसत आतहे. परंतु बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने टाळ्या वाजवल्या नाहीत. त्याऐवजी प्रियांका आपला स्कार्फ नीट करताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने या दोघांकडे लक्षही दिले नाही. प्रियांकाच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. तर काहींनी तिच्या या कृतीचे समर्थनही केले आहे.
दरम्यान, ब्रिटीश राजघराण्यामध्ये असलेला असंतोष आता जगजाहीर झाला आहे. इंग्लंडच्या राणीचा नातू आणि राजघराण्याचे सहावे वारसदार प्रिन्स हॅरीने हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केलशी लग्न केले. या लग्नाला महाराणी एलिझाबेथ यांचा विरोध होता. लग्नानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांनी राजघराण्याशी सर्व संबंध तोडले. हे दोघे आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियात रहात आहेत. त्यानंतरही राजघराण्यात धुसफूस सुरूच आहे.

प्रियांका आणि मेगन या खास मैत्रिणी आहेत. मेगनच्या शाही लग्नातही प्रियांका आवर्जून उपस्थित होती. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रियांकाने प्रिन्स विल्यम आणि केटला जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचीही चर्चा सुरू आहे.