[ad_1]
हायलाइट्स:
- सोशल मीडियावर राहुल आणि दिशाच्या फोटोंचा धुमाकूळ
- दिशाला नववधूप्रमाणे सजलेलं पाहण्यासाठी चाहते उत्सुक
- संगीत समारंभासाठी दलेर मेहंदी यांना बोलावण्याची होती राहुलची इच्छा
मंदिरा बेदीने एकटीने सेलिब्रेट केला लग्नाचा २३ वा वाढदिवस
दिशांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिशा प्रचंड सुंदर दिसत असून दिशाच्या चेहऱ्यासह, हातावर आणि पायावर हळद लागली आहे. दिशादेखील या लग्नसोहळ्याचा आनंद घेत असून फोटोंसाठी निरनिराळ्या पोज देत आहे. दिशासोबतच राहुललाही हळद लागली असून त्याचेही हळदीचे फोटो चाहत्यांमध्ये वायरल झाले आहेत. चाहते दिशा आणि राहुलच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दिशा आणि राहुलच्या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे. आता चाहते दिशा आणि राहुलला पारंपरिक वधू- वराच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
हळद समारंभानंतर राहुल आणि दिशा यांनी संगीत समारंभाचं देखील आयोजन केलं आहे. या क्षणासाठी राहुल आणि दिशा अनेक दिवसांपासून तयारी करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल आणि दिशा संगीत समारंभात नृत्य करणार आहेत. राहुलने दिशाला ‘बिग बॉस १४’ मध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना दिशा आणि राहुलच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर काही तासांनी चाहत्यांची ही इच्छादेखील पूर्ण होणार आहे.
दिशाच्या मेहंदीला राहुल वैद्यचा रोमँटिक अंदाज, गायलं खास गाणं
[ad_2]
Source link