हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत ५४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४ हजार ७६४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९४८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ८,०१० नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू १७०
मुंबईत आज ३६ हजार ५६८ चाचण्या
मुंबईत आज एकूण ३६ हजार ५६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ७ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ७३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई: धारावीत आज ५ नवे करोना रुग्ण, माहीममध्ये आढळले १० रुग्ण
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ५४५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५०५
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०४७६४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७०१२
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९४८ दिवस
कोविड वाढीचा दर (०८ जून ते १४ जुलै)- ०.०७ %
क्लिक करा आणि वाचा- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला शिवसेनेची १० लाख रुपयांची मदत, दिले ‘हे’ आश्वासन
ठाण्यात आढळले ७९ नवे रुग्ण
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण ७९ करोना बाधित नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात फक्त १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३१ हजार ७७८ रुग्ण बरे झाले असून एकूण २ हजार ०४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.