हायलाइट्स:
- करिनाच्या दुसऱ्या मुलाचा जेहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- प्रेग्नेंसी बायबल पुस्तकामध्ये जेहचे फोटो
- तैमूरसारखाच दिसतोय जेह, चाहत्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
पुस्तकात छापलेले जेहचे फोटो करिना कपूरच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘करिनाच्या पुस्तकातील तिचे आणि तिच्या मुलांचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले फोटो पाहून आम्ही सगळेजण आनंदीत झालो आहोत. पहिला फोटो तैमूरचा आहे आणि दुसरा फोटो जेहचा आहे.’ या फोटोमध्ये करिना आणि तिचा छोटा मुलगा जेह दिसत आहेत. हा फोटो पाहून जेह अगदी तैमूरसारखाच दिसतो असं अनेकांनी म्हटलं.
दरम्यान, करिना कपूरने तिच्या दोन प्रेग्नेंसीवर आधारीत ‘प्रेग्नंसी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. परंतु या पुस्तकाच्या नावावरून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही ख्रिश्चन संघटनांनी या पुस्तकाच्या नावावरून आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर करिना आणि पुस्तकाच्या प्रकाशकांविरोधात बीड शहरामध्ये पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. ख्रिश्चन समुदायाने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ९ जुलै रोजी करण्यात आले होते. हे पुस्तक म्हणजे माझे तिसरे मूल आहे, अशा भावना करिनाने व्यक्त केल्या आहेत.