Home मनोरंजन आधी व्हायचं होतं पत्रकार, एका नाटकाने बदललं सुरेखा सीकरींचं आयुष्य

आधी व्हायचं होतं पत्रकार, एका नाटकाने बदललं सुरेखा सीकरींचं आयुष्य

0
आधी व्हायचं होतं पत्रकार, एका नाटकाने बदललं सुरेखा सीकरींचं आयुष्य

[ad_1]

हायलाइट्स:

  • आईचं म्हणणं मान्य करत सुरेखा यांनी घेतला होता एनएसडीला प्रवेश
  • अनेक मालिका आणि चित्रपटातून उमटवला आहे अभिनयाचा ठसा
  • ‘बालिका वधू’ मालिकेतील पात्रामुळे मिळाली घराघरात ओळख

मुंबई- ‘बधाई हो’ चित्रपटातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं आज १६ जुलै २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘बालिका वधू‘ या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या मालिकेतून सुरेखा यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बाहेरून कठोर पण मनाने प्रेमळ असणाऱ्या या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आपल्या अभिनयाने सुरेखा त्यांच्या सहकलाकारांवरही भारी पडत. परंतु, अभिनयासाठी फिल्मफेअर मिळवणाऱ्या सुरेखा यांचं स्वप्न तर एक पत्रकार होण्याचं होतं.

VIDEO: ब्रिटिनच्या शाही दाम्पत्याकडं दुर्लक्ष केल्यानं प्रियांका होतेय ट्रोल

१९ एप्रिल १९४५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या सुरेखा पत्रकार किंवा लेखिका बनू इच्छित होत्या. परंतु, नियतीने मात्र त्यांचे रस्ते आधीपासूनच ठरवले होते. सुरेखा तेव्हा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होत्या. एकेदिवशी त्यांच्या कॉलेजमध्ये अब्राहम अलकाजी आले होते. त्यांनी सादर केलेलं नाटक पाहून सुरेखा खूप प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्या एनएसडीचा फॉर्मदेखील घेऊन आल्या होत्या. परंतु, अनेक दिवस तो फॉर्म त्या भरू शकल्या नव्हत्या. सुरेखा यांच्या आईने त्यांना फॉर्म भरण्याचा सल्ला दिला. आईचं म्हणणं मान्य करत त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना कॉलेजमध्ये प्रवेशदेखील मिळाला.

त्यानंतर सुरेखा यांनी अनेक वर्ष नाटकांत काम केलं. छोट्या पडद्यावर त्यांनी ‘बालिका वधु’, ‘बनेगी अपनी बात’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘केसर’, ‘कभी कभी’ आणि ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु, त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘बालिका वधू’ मालिकेतील दादीसा या पात्रामुळे. सुरेखा यांनी चित्रपटांमध्येही नाव कमावलं. ‘नसीब’, ‘सरदारी बेगम’, ‘दिल्लगी’, ‘नजर’, ‘जुबेदा’, ‘रेन कोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, आणि ‘घोस्ट स्टोरीज’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘बधाई हो’ मधील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं कार्डिएक अरेस्टने निधन

[ad_2]

Source link