हायलाइट्स:
- मुंबईत होत आहे दिशा आणि राहुलचा विवाह सोहळा
- लग्नासाठी दिशा आणि राहुलची तयारी सुरू
- काही खास पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडणार विवाहसोहळा
दिशा आणि राहुल यांचं लग्न मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये होणार असून त्यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. हॉटेलमध्ये राहुल आणि दिशासह त्यांच्या कुटुंबीयांचं अत्यंत सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आलं असून लग्नासाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची थीम निवडण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये राहुल आणि दिशा त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांची तयारी करताना दिसत आहेत. त्यापूर्वी हॉटेलवर दिशाला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम देखील करण्यात आला.
हा विवाहसोहळा घरातील काही निवडक मंडळींच्या उपस्थितीत होणार आहे. सोहळ्यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलं आहे. परंतु, ‘बिग बॉस १४’ मधील काही स्पर्धक देखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. त्यात अली गोनी, जास्मिन भसीनचा समावेश आहे. राहुल आणि दिशा त्यांच्या रिसेप्शनवेळी नृत्य करणार असल्याचंदेखील बोललं जात आहे. त्याचीही त्यांनी तयारी केली आहे. आता चाहत्यांना राहुल आणि दिशाला एकत्र पाहण्याची ओढ लागली आहे.
राहुल- दिशाची लगीनघाई! हळदीने खुललं नवरीचं सौंदर्य, फोटो व्हायरल