Home ताज्या बातम्या Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’

Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’

0
Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’

हायलाइट्स:

  • अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
  • प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला
  • तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक – दरेकर

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे सव्वा चार कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) जप्त केली आहे. या कारवाईमुळं महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) अस्वस्थता असून भाजपनं ही संधी साधत राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान साधलं आहे. ईडीची (ED) ही कारवाई म्हणजे केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्यांना चपराक आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर प्रवीण दरेकर यांनी व्हिडिओ ट्वीट केलं आहे. ‘केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा राजकीय सुडापोटी काम करताहेत असा आरोप करणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली आहे. ‘ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती जप्त झालीय याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती. त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे,’ असं ते म्हणाले. ‘कोणत्याही तपास यंत्रणेला मनमानीपणे कारवाई करता येत नाही, असं आमचं म्हणणं होतं. ते खरं ठरलं आहे. भाजप, केंद्र सरकार व तपास यंत्रणेवर आरोप करणाऱ्यांचं आता तरी समाधान होईल. कारण या प्रकरणात तथ्य असल्याचं आता सिद्ध झालं आहे. भविष्यात यामधील एक एक गोष्टी आणि सत्य लोकांसमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
देशमुख यांच्या कोणत्या मालमत्तांवर टाच?

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. त्यात वरळी येथील १.५४ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील २.६७ कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा:

शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम पुन्हा गोत्यात

पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज; ‘या’ नेत्याने थेट सांगून टाकले!

उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

Source link