हायलाइट्स:
- बॉलिवूडच्या हिट अभिनेत्रींपैकी एक आहे कतरिना कैफ
- बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी कतरिनाने बदललं नाव
- प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देवदर्शनासाठी जाते कतरिना
ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं कार्डिएक अरेस्टने निधन
कतरिनाने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटात काम करून केली होती. २००३ साली दिग्दर्शक कायजाद गुस्ताद यांनी कतरिनाला एका फॅशन शोमध्ये पाहिलं आणि तिला ‘बूम’ चित्रपट ऑफर केला. या चित्रपटात एक सीन होता जिथे कतरिनाला गुलशन ग्रोवर यांना किस करायचं होतं. त्या प्रसंगी अमिताभ बच्चन देखील तिथे उपस्थित होते. असं म्हटलं जातं की गुलशन आणि कतरिना यांनी २ तास एका खोलीत किस करण्याची प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर सीन पूर्ण केला. गुलशन आणि कतरिना यांच्या त्या किसिंग सीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यांचा चित्रपटातील किसिंग सीन प्रचंड चर्चेत होता.
चित्रपट प्रदर्शनानंतर या सीनवरून अनेक वाद निर्माण झाले होते. जेव्हा कतरिनाला ‘बूम’ चित्रपटातील या सीनबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा कतरिनाने म्हटलं, ‘हा सीन दिला पण तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ होते. मी सीनला नाही म्हटलं नाही पण माझ्यासाठी ते सोपं नव्हतं.’ कतरिना आणि गुलशन यांचा चित्रपटातील तो सीन आजही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. युट्युबवरही तो सीन कोट्यवधी वेळा पाहिला गेला आहे.
व्हायचं होतं पत्रकार, एका नाटकाने बदललं सुरेखा सीकरींचं आयुष्य