Home ताज्या बातम्या ED Raids on Videocon Properties: ‘व्हिडिओकॉन’ला हादरा; मुंबई आणि औरंगाबादमधील ठिकाणांवर ईडीचे छापे

ED Raids on Videocon Properties: ‘व्हिडिओकॉन’ला हादरा; मुंबई आणि औरंगाबादमधील ठिकाणांवर ईडीचे छापे

0
ED Raids on Videocon Properties: ‘व्हिडिओकॉन’ला हादरा; मुंबई आणि औरंगाबादमधील ठिकाणांवर ईडीचे छापे

हायलाइट्स:

  • व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबादमधील ठिकाणांवर छापे.
  • आयसीआयसीआय बँक कर्ज प्रकरणात ईडीची मोठी कारवाई.
  • पीएमएलए कायद्यांतर्गत आधीच दाखल आहे एफआयआर.

मुंबई:व्हिडिओकॉन समूहावर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई सुरू केली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत आणि राजकुमार धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घर व कार्यालयांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. ( ED Raids on Videocon Properties )

वाचा:मनसेला शिवसेनेचा जोरदार धक्का; ‘हा’ प्रमुख नेता अडकला शिवबंधनात

आयसीआयसीआय बँकेशी संबंधित कर्ज प्रकरण आणि परदेशातील तेल तसेच, नैसर्गिक वायू उत्खनन आणि विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवाईने व्हिडिओकॉन समूहाला मोठा हादरा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी पथकाने मुंबईत मलबार हिल आणि गोवंडी भागात छापे टाकले. येथील व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर झडती घेण्यात आली आहे. अशाच प्रकारचे छापे औरंगाबाद येथेही टाकण्यात आले आहेत. या कारवाईबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही.

वाचा: अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त; वाझे मार्फत वसुलीचेही पुरावे

काय आहे प्रकरण?

आयसीआयसीआय बँकेशी संबंधित कर्ज प्रकरणात व्हिडिओकॉन समूहाचे मालक राजकुमार धूत आणि वेणूगोपाल धूत हे धूत बंधू ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची या कर्जपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका राहिली होती, असा आरोप आहे. या कर्ज प्रकरणाच्या बदल्यात व्हिडिओकॉन समूहाने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवले होते. ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती, असाही आरोप आहे. या प्रकरणात चंदा कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि अन्य काही जणांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत एफआयआरही दाखल झालेला आहे. याच प्रकरणात दीपक कोचर यांना अटकही करण्यात आली होती.

वाचा: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर…; आठवलेंची शिवसेनेला साद

Source link