Home ताज्या बातम्या maharashtra tops in vaccination: नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

maharashtra tops in vaccination: नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

0
maharashtra tops in vaccination: नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

हायलाइट्स:

  • कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले.
  • त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळलेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे.
  • तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळलेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे. (Maharashtra tops the country in overall vaccination of citizens)

लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच १ कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज १३,४५२ रुग्ण झाले बरे; तर ७,७६१ नव्या रुग्णांचे निदान

दरम्यान, आज रात्री आठपर्यंत सुमारे ६ लाख १३ हजार ८६५ एवढे लसीकरण झाले. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक झाली, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- जळगावात कोसळलेले ‘ते’ विमान प्रशिक्षण देणारे, वैमानिकाचा मृत्यू

करोना चाचणीचा साडेचार कोटींचा टप्पा पार

या बरोबरच, महाराष्ट्रात करोना प्रयोगशाळा नमुना चाचणीचा साडेचार कोटींचा टप्पा पार झाला झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या बरोबरच राज्यात आज ७ हजार ७६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १३ हजार ४५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह, अर्थात ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ०१ हजार ३३७ इतकी झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- अडीच हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणालाच शॉक; आर्थिक स्थिती डबघाईला

Source link