हायलाइट्स:
- टी- सीरिजचे भूषण कुमार बलात्काराच्या आरोप प्रकरणात आणखी एक वळण
- खंडणी न दिल्याने भूषण कुमार यांना खोट्या आरोप गोवण्यात आल्याचा कंपनीचा दावा
- मुंबई पोलीस याप्रकरणाचा करत आहेत तपास
टी- सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये या मुलीने तिच्या वेब सीरिजसाठी पैसे देण्याची मागणी भूषण कुमार यांना केली होती. परंतु ती मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर तिने खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांकडे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आल्यामुळे प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली होती. आता याप्रकरणामध्ये आणखी एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेप केसमध्ये ट्वीस्ट- महिलेविरोधात आधीच अंबोली पोलीस ठाण्यात दाखल आहे खंडणीची केस
टी- सीरिज कंपनीने याप्रकरणी आणखी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, ठाण्यातील राजकीय नेता मल्लिकार्जुन पुजारीने जून २०२१ मध्ये भूषण कुमार यांना फोन करून खंडणी मागितली होती. त्यानंतर सातत्याने तो भूषण कुमार यांना खंडणीसाठी फोन करत होता. पैसे न दिल्यास भूषण कुमार यांना बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची धमकीदेखील दिली होती. या दोघांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही केले होते.
याप्रकरणी टी- सीरिज कंपनीने अंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल करत या दोघांच्या संभाषणाच्या क्लिप पोलिसांकडे दिल्या. तक्रार दाखल केल्यानंतर टी- सीरिजचे कृष्ण कुमार यांनी मल्लिकार्जुन पुजारीची एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी पुजारीने कृष्ण कुमार यांच्याकडे खंडणी मागितली होती. मात्र कृष्णा कुमार यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.
भूषण कुमारविरुद्ध दाखल झाली रेप केस, काम देतो सांगून बलात्कार केल्याचा आरोप
नेमके काय आहे प्रकरण ?
टी- सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर यांच्यावर १६ जुलै रोजी एका ३० वर्षांच्या महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर टी-सीरीज कंपनीने निवेदन प्रसिद्ध करत हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.