[ad_1]
हायलाइट्स:
- मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या नात्याची चर्चा
- कतरिनाच्या वाढदिवशी सलमानच्या स्टायलिस्टनं केलेली पोस्ट चर्चेत
- विकी आणि कतरिना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा चाहते लावतायत अंदाज
कतरिनाच्या वाढदिवशी कॉस्ट्यूम डिझायनर आणि सलमान खानचा स्टायलिस्ट अॅशले रिबेलोनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. अॅशले रिबेलोच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवर वेडिंग गाऊनमध्ये कतरिना कैफ दिसत आहे. हा फोटो सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या वेळचा आहे. हा फोटो शेअर करताना अॅशलेनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कतरिना. हा फोटो लवकरच खरा होऊ दे.’
अॅशले रिबेलोच्या या पोस्टनंतर कतरिनाच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नच्या बेडीत अडकणार की काय अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दरम्यान कतरिनाच्या अपार्टमेंटमधून निघत असताना विकी कौशल अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला असल्यानं या दोघांच्या नात्याची वारंवार सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. दरम्यान अभिनेता हर्षवर्धन कपूरनं या दोघांच्या नात्यावर भाष्य करत हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
कामाबद्दल बोलायच्या तर कतरिना कैफ लवकरच रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याशिवाय ती इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ‘फोन भूत’मध्येही दिसणार आहे. सध्या ती सलमान खानसोबत ‘टायगर ३’चं शूटिंग करत आहे. तर दुसरीकडे विकी कौशलकडे ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक हे चित्रपट आहेत.
[ad_2]
Source link