Home मनोरंजन अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक…प्राजक्ता माळी आता नव्या भूमिकेत; चाहत्यांना सरप्राइज

अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक…प्राजक्ता माळी आता नव्या भूमिकेत; चाहत्यांना सरप्राइज

0
अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक…प्राजक्ता माळी आता नव्या भूमिकेत; चाहत्यांना सरप्राइज

[ad_1]

  • मुंबई टाइम्स टीम

अभिनेत्री सातत्यानं काही वेगळं करत असते. भूमिका असोत, सूत्रसंचालन असो वा चाहत्यांशी संवाद. प्राजक्ता आता कवयित्री म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री, , म्हणून काम केल्यावर आता तिचा काव्यसंग्रह समोर येत आहे. ‘’ असं तिच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. यात तिची संवेदनशील बाजू काव्यातून व्यक्त होत आहे. या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या हस्ते होणार आहे.

या नव्या प्रवासाबद्दल प्राजक्ता सांगते, ‘कधी कुठं छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही, तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. योगायोगानं हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे. या संग्रहातल्या कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असून त्या अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत. अजिबातच क्लिष्ट नाहीत; त्यामुळेच त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील, भावतील आणि आवडतील अशी आशा आहे.

आजवर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर, नृत्यावर भरभरून प्रेम केलं. वेळोवेळी मला प्रतिक्रियाही दिल्या. मला आशा आहे, की या काव्यसंग्रहालाही रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील.’ प्राजक्ताच्या चाहत्यांना तिचा हा नवा पैलू जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link