हायलाइट्स:
- राज कुंद्रा आणि रयान थार्पला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
- राज कुंद्राच्या विरोधात फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल झाली होती तक्रार
- पोर्नोग्राफी प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे राज कुंद्रा
‘पॉर्न’ व्हिडीओ निर्मिती प्रकरणात नवऱ्याला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं घेतला मोठा निर्णय
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केलेली तक्रार
काल १९ जुलै रोजी रात्री राजला गुन्हे शाखेने अटक केली. अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर दाखवण्याचा आरोप राजवर ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमध्ये प्रदीर्घ चौकशीनंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये राजविरोधात तक्रार दाखल केली गेली होती.
या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड राज कुंद्रा
मुंबई गुन्हे शाखेने म्हटल्याप्रमाणे राज कुंद्रा हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा भाऊ यांनी केनरिन नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुरू केलेल्या अॅपमार्फत अश्लील सिनेमे दाखवले जातात. सिनेमांचे व्हिडिओ भारतात चित्रीत करण्यात येतात आणि व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात येतात.