काय म्हणाली कंगना?
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे, ‘ हेच कारण आहे म्हणू मी फिल्म इंडस्ट्रीला गटार असे म्हणते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते. माझ्या निर्मिती संस्थेतर्फे तयार होणा-या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमातून या बॉलिवूडमधील याच गोष्टी मांडणार आहे. आपल्याला मनोरंजन विश्व सक्षम मूल्यांवर, विवेकावर आधारीत तयार करण्याची गरज आहे…’
दरम्यान, राज कुंद्रा सोमवारी रात्री नऊ वाजता भायखळा येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात आले. त्यांची तिथे दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक झाली. क्राईम ब्रँचने त्यांच्याविरोधात फेब्रुवारी २०२१ मध्ये तक्रार दाखलकेली होती. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा साडेपाच महिने कसून तपास केला, अनेकांची चौकशी केली त्यानंतर एकेक गोष्टींचा तपास केला. त्यातून या सगळ्याचा मास्टर माईंड हा राज कुंद्रा असल्याचे समोर आले.
मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले, ‘ राज कुंद्रा या प्रकरणातील प्रमुख संशयीत आहेत. त्यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे देखील आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी राज कुंद्रासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.’
- Advertisement -