मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही पहाटेपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. (Mumbai Rain update)
Live Update
२३ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नागपूरात उद्या व परवा अतिवृष्टीचा इशारा; आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरुच
- समुद्र खवळला; मरिन ड्राइव्ह येथे आज उंच लाटा उसळल्या
- मुंबईः चेंबूरमध्ये मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचले; पाण्यातून मार्ग काढण्यात अडचणी
- मुंबईः सायन, वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
- मुंबई, ठाणे, कल्याण, रायगडसह कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा
- वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच; सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
- सायन परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
- कोल्हापूरः मुसळधार पावसामुळं ३१ बंधारे पाण्याखाली; पंचगंगेची पाणी पातळी २८ फुटावर
- कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर; पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
- मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस; रस्ते व लोकल वाहतूक सुरळीत
- नाशिक: शहरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू, सकाळी साडेआठपर्यंत १३.४ मिलिमीटर पावसाची नोंद
- नवी मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा
- ठाण्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात
- सकाळी १० वाजता समुद्राला मोठी भरती येणार; महापालिका सतर्क
- वसई- नालासोपारा परिसरात पावसाचा जोर वाढला
- मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात
- Advertisement -