Raj Kundra Case: ‘देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव’, राज कुंद्रावर यूट्यूबरचा धक्कादायक आरोप

Raj Kundra Case: ‘देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव’, राज कुंद्रावर यूट्यूबरचा धक्कादायक आरोप
- Advertisement -


मुंबई- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. राजवर अश्लील सिनेमे बनवल्याचा आणि सशुल्क अ‍ॅप्सवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. राजच्या अटकेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही लोक राज कुंद्रावर दोषारोप करीत आहेत, तर काही लोक त्याच्याविरोधात कट रचला गेल्याचं म्हणत आहेत. आता राजच्या विरोधात एक प्रसिद्ध यूट्यूबरही मैदानात उतरली आहे.

राज कुंद्राच्या चॅटवरून धक्कादायक खुलासा, अॅपमधून दिवसाला व्हायची लाखोंची कमाई

यूट्यूबर पुनीत कौर ने सोशल मीडियावर दावा केला आहे की, अश्लील अ‍ॅप ‘हॉटशॉट्स’ च्या व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी राज कुंद्राने तिच्याशी संपर्क साधला होता. पुनीतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज कुंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटशॉट्स व्हिडिओमध्ये काम करण्या संबंधीचा मेसेज केला होता.

पुढच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुनीतने लिहिले की, सुरुवातीला तिला हा एखादा स्पॅम मेसेज असल्यासारखं वाटलं होतं. तिने लिहिले की, ‘हा किती खालच्या पातळीचा माणूस आहे. आम्ही विचार केलेला की मला आलेला मेसेज स्पॅम असेल. देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव.’

पुनीत कौर

अटकेनंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी २० जुलै २०२१ रोजी राज कुंद्राला न्यायालयात हजर केले गेले. कोर्टाने सुनावणी देताना राजला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश दिले. राज व्यतिरिक्त मुंबई पोलिसांनी इतर अनेक लोकांना अश्लील सिनेमे बनविण्याच्या प्रकरणात अटक केली आहे.



Source link

- Advertisement -