[ad_1]
हायलाइट्स:
- अनेक महिने नैराश्यात होती दीपिका पादुकोण
- दीपिकाला अचानक रडताना पाहून आईला आला अंदाज
- मुलीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी दीपिकाच्या आईने केली मदत
‘रिटा रिपोर्टर’ फेम प्रियाची ब्रा दिसली म्हणून केलं ट्रोल
दीपिका कायमचं तिच्या आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. दीपिकाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, ‘मला फेब्रुवारी २०१४ मध्ये नैराश्य यायला सुरुवात झाली. मला सगळं जीवन व्यर्थ वाटायचं. ती वेळ अशी होती जेव्हा मला कोणत्याच गोष्टीचा अर्थ लागत नव्हता. मला वाटायचं मी का जगतेय? माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे? मी मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे तुटली होती. माझी आई उज्ज्वला पादुकोण हिने
दीपिका म्हणाली, ‘मी खूप महिने नैराश्यात होते. कधी कधी तर मला माझा जीव घ्यावासा वाटायचा. अशात माझं कुटुंब मला भेटायला मुंबईला आलं. जेव्हा ते परत जाण्यासाठी बॅग भरू लागले, तेव्हा मी खोलीत जाऊन खूप रडू लागले. ते पाहून माझ्या आईला समजलं माझं रडणं हे साधं रडणं नाहीये. तिने मला विचारलं काय झालं? पण तेव्हा मी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण माझ्या आईच्या मनाने सगळं ओळखलं. ती माझ्यासोबत राहिली. त्या दिवसात आईने मला खूप मदत केली. तिच्यामुळेच मी या संकटातून बाहेर पडू शकली. अजूनही मला भीती वाटते की, मी पुन्हा नैराश्यात जाईन. पण मी आता खूप काळजी घेते.’
[ad_2]
Source link