Home मनोरंजन पती राज कुंद्राच्या अटकेचा शिल्पाच्या ‘हंगामा २’वर होणार का परिणाम? निर्मात्यांनी दिलं उत्तर

पती राज कुंद्राच्या अटकेचा शिल्पाच्या ‘हंगामा २’वर होणार का परिणाम? निर्मात्यांनी दिलं उत्तर

0
पती राज कुंद्राच्या अटकेचा शिल्पाच्या ‘हंगामा २’वर होणार का परिणाम? निर्मात्यांनी दिलं उत्तर

[ad_1]

हायलाइट्स:

  • शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
  • शिल्पा शेट्टीच्या पतीला चित्रपट रिलीजआधीच पॉर्न फिल्म प्रकरणात झाली आहे अटक
  • राज कुंद्राच्या अटकेचा शिल्पाच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री लवकरच ‘हंगामा २‘ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. तिचा हा चित्रपट २३ जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच शिल्पाचा पती राज कुंद्राला १९ जुलैला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक केली आहे. ज्याच्या परिणाम शिल्पाच्या करिअरवर आणि पर्यायानं ‘हंगामा २’च्या रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते रजत जैन म्हणाले, ‘कोणी ‘हंगामा २’च्या रिलीजमध्ये हस्तक्षेप करण्याची काय गरज आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर आरोप लावण्यात आले आहेत. पण शिल्पावर कोणताही आरोप अद्याप लावण्यात आलेला नाही. ती चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिनं प्रमोशनसोबतच स्वतःचं सर्व काम पूर्ण केलं आहे. याशिवाय पोलीस तपासातही शिल्पाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आमच्या चित्रपटाच्या रिलीजमध्ये काही बाधा येईल असं मला तरी वाटत नाही. या प्रकरणात शिल्पाचं नावही घेतलं जातंय हे दुर्दैवी आहे.’


निर्माता रजत जैन पुढे म्हणाले, ‘आम्ही प्रामाणिकपणे चांगला चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट कथित शिल्पा शेट्टी वादामुळे नाही तर त्यातील कंटेन्टमुळे पाहिला जाणार आहे. हा चित्रपट त्याच्या ठरलेल्या वेळेतच रिलीज केला जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा अर्थातच चित्रपटाच्या रिलीजवर काहीही परिणाम होणार नाही.’

‘हंगामा २’मध्ये शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त, परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लीवर, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शननं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला या चित्रपटाचा ट्रेलर बराच गाजला होता.



[ad_2]

Source link