[ad_1]
हायलाइट्स:
- अभिनेत्री अनिता हसनंदानीने खरेदी केली मर्सिडीज बेन्जॉ
- इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
- नवीन गाडीचे आणि अनिताच्या लेकाचे आहे खास कनेक्शन
अनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मर्सिडीज बेन्ज गाडी शोरूममधून विकत घेतानाचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नवरा रोहित रेड्डी ही दिसत आहे. हे दोघे मिळून हा आनंदाचा क्षण एन्जॉय करताना दिसले. हे फोटो पोस्ट करताना अनिताने तिचा लाडका लेक आरव आणि नवीन विकत घेतलेल्या गाडी यांच्याबद्दलचे एक गुपीत शेअर केले.
अनिताने विकत घेतलेल्या गाडीचा नंबर ०९०२ असा आहे. हा नंबर म्हणजे तिच्या लाडक्या लेकाची जन्म तारीख आहे. नवीन गाडीची नंबर प्लेट शेअर करत अनिताने हार्टचं इमोजी शेअर करत लिहिले की ‘आरव रेड्डीची जन्मतारीख… परंतु त्याच्यापेक्षा जास्त रोहित रेड्डी उत्साहित आहे.’
दरम्यान, आरवचा जन्म झाल्यानंतर अनिता टीव्हीवर पुन्हा काम करणार नाही अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यावर अनिताचा नवरा रोहितने म्हणाला होता की, ‘अनिता सध्या तिचे आईपण एन्जॉय करत आहे. ती आमच्या लेकासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. आमच्या दोघांच्याही प्रायोरिटीवर आमचा मुलगा आहे. अशा परिस्थितीमध्ये तिच्यासाठी काम हे शेवटी आहे. सध्या तिच्याकडे सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या अनेक जाहिराती आहेत. त्यामुळे ती घरातच व्यग्र असते. काही दिवसांनी ती नक्कीच टीव्हीवर परत काम करू लागेल.’
अनिता हसनंदानीने काव्यांजली, कभी सौतन कभी सहेली, ये हैं मोहब्बतें यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. अनिताने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अनिता सध्या आईची भूमिका खूप छान पद्धतीने साकारत आहे.
[ad_2]
Source link