Raj Kundra Porn Case- राज कुंद्रा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच, आता सट्टाबाजीचाही संशय

Raj Kundra Porn Case-  राज कुंद्रा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच, आता सट्टाबाजीचाही संशय
- Advertisement -


हायलाइट्स:

  • पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा आणि राय थार्पेला दिलासा नाहीच
  • २७ जुलैपर्यंत दोघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालायचे आदेश
  • पोर्नोग्राफीमध्ये मिळवलेला पैसा ऑनलाई सट्टेबाजीत वापरल्याचा पोलिसांना संशय

मुंबई : पॉर्न व्हिडिओंची निर्मिती करत ते इण्टरनेटवर अपलोड केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालायने दिले. राजबरोबर त्याचा साथीदार रायन थॉर्पेलाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज आणि रायनला शुक्रवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी राज आणि त्याच्या साथीदाराची अधिक चौकशी करायची असल्याचे सांगत दोघांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने पोलिसांनी केलेली ही विनंती मान्य करत या दोघांनाही २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

राज कुंद्राने पोलिसांपासून वाचण्यासाठी केलेला मोठा ‘जुगाड’, मिळाले पुरावे

दरम्यान, या पॉर्नोग्राफीमधून मिळालेला पैसा राजने ऑनलाइन सट्टेबाजीसाठी लावला असल्याचा पोलिसांना संशय आहे. राज कुंद्राच्या येस बँके आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यांतून झालेल्या व्यवहारांची चौकशी पोलिसांना करायची आहे. न्यायालायने या दोघांची पोलीस कोठडी वाढवली असून त्यांची रवानगी पुन्हा एकदा भायखळा कारागृहात झाली आहे.

अश्लील व्हिडिओ, चित्रपट व वेब सीरिज बनवून ते मोबाइल अॅप व संकेतस्थळांवर अपलोड करत असल्याच्या आरोपावरून उद्योजक रिपू सुदन बालकिशन कुंद्रा ऊर्फ राज कुंद्राला सोमवारी १९ जुलै रोजी अटक झाली होती. त्यानंतर राजला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

या पाच दिवसांमध्ये राज आणि त्याचा साथीदार रायनची कसून चौकशी झाली. चौकशीमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी पुढे आल्या आहेत. राजला अटक होण्याआधी मड येथील एका बंगल्यावर पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी त्यांना तिथून पॉर्न व्हिडिओचे चित्रीकरण सुरू असलेले दिसले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि तपासामध्ये राज कुंद्रा याच्याविरुद्ध सबळ पुरावे पोलिसांना मिळाले. त्याच्या आधारावर राज कुंद्राला अटक करण्यात आली.

अटकेतून वाचण्यासाठी राज कुंद्राने पोलिसांना दिलेली २५ लाखांची लाच? आरोपीचा दावा



Source link

- Advertisement -