प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ला ७५० मेगावॉट विजेची गरज होती. त्यासाठी त्यांनी काढलेल्या निविदेला मनीकरण पॉवर लिमिटेड, महावितरण व टाटा पॉवर यांनी प्रतिसाद दिला. यापैकी मनीकरण पॉवर लिमिटेडने १०० मेगावॉटपोटी ३.९४ रुपये प्रति युनिट इतका दर देऊ केला होता. तर महावितरण प्रत्येकी २०० मेगावॉटपोटी ३.९४ आणि ५.२० रुपये प्रति युनिट तसेच टाटा पॉवर २५० मेगावॉटसाठी ४.२१ रुपये प्रति युनिट दर देत होती. यानुसार मनीकरण पॉवरकडून १०० मेगावॉटसाठी ‘बेस्ट’ने वीज खरेदी करार केला. परंतु या करारानुसार वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याची याचिका ‘बेस्ट’ने आयोगात केली होती. त्यानुसार ‘बेस्ट’ नव्याने हा करार अमलात आणून त्यापोटी येणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा विचार मध्यकालीन दर आढाव्यात घेतला जाईल, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.
वीजखरेदीचा खर्च वाढला
म. टा. प्रतिनिधी
- Advertisement -