[ad_1]
हायलाइट्स:
- सोशल मीडियावर वायरल होतोय दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ
- शाळेतील शिक्षकांसमोर गाणं गात आहे मुलगा
- चाहत्यांमध्ये बादशाह आणि सहदेवचा व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता
Bigg Boss 15: बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन करण जोहरच्या हाती
सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक शाळकरी मुलगा त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. या मुलाचं नाव सहदेव असून तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड येथे राहतो. पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला. या व्हिडिओची लोकप्रियता इतकी वाढली की बादशाहने स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सहदेवसोबत संपर्क साधला. बादशाहने मुलासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला बोलवलं. यानंतर बादशाह आणि सहदेव लवकरच एखाद्या गाण्यात एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
https://www.youtube.com/watch?v=Gvz6DHn3lpo
वायरल झालेल्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केलं आहे. नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु, स्वतः बादशाहने सहदेवसोबत साधलेला संपर्क पाहता त्यांच्या व्हिडिओची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
[ad_2]
Source link