हायलाइट्स:
- अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच असतो चर्चेत
- सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ खूप होतोय व्हायरल
- व्हायरल व्हिडीओमधील रितेशचं वागणं पाहून चाहते करतायंत कौतुक
रितेश देशमुख मागच्या काही काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र तो नेहमीच सक्रिय असलेला पाहायला मिळतो. अनेकदा तो पत्नी जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. चित्रपटांतून नाही तर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र तो चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. पण यासोबतच तो त्याच्या विनम्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच समोर आलेला त्याचा व्हिडिओ याचा पुरावा आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही.
रितेश देशमुखचा हा व्हिडीओ प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख त्याच्या एका वयोवृद्ध चाहत्याला भेटताना दिसत आहे. रितेशला भेटल्यावर ते काका खूप खुश होतात. ते रितेशला पाहण्यासाठी मास्क काढण्यास सांगतात. पण जेव्हा रितेश त्याचा मास्क बाजूला करतो तेव्हा ते काका त्याला ‘गुंडासारखा दिसतोयस’ असं म्हणताना दिसतात.
या व्हिडीओमध्ये त्या काकांनी रितेशला गुंड म्हटलेलं असतानाही रितेश मात्र प्रेमानं त्याच्याशी हात मिळवतो. त्यांना स्वतःची काळजी घ्यायला सांगतो आणि मग आपल्या कारमध्ये बसून निघून जातो. रितेशचा हा व्हिडीओ आणि त्यातील त्याचं वागणं पाहून सोशल मीडियावर खूप कौतुक करताना दिसत आहेत. एक युझरनं लिहिलं, ‘रितेश खूपच विनम्र आहे. मी त्याला आणि जेनेलियाला भेटलो आहे. त्या दोघांचा स्वभाव खूपच चांगला आहे.’