मुंबई: अल्पावधीतच देशभरात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण करणारा अभिनेता म्हणून विकी कौशलला ओळखलं जातं. विकीनं ‘लव्ह पस स्क्वेअर फूट’ ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘भूत’ या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवली. लॉकडाउनमध्ये मोकळा वेळ मिळाल्यानं अनेक कलाकारांनी त्यांच्या कलाकौशल्यांना वेळ दिला.
भूमिकांची तयारी करतानाच त्यानं त्याच्यातल्या चित्रकाराला वेळ दिला. आगामी काळातही त्याच्याहाती उत्तमोत्तम चित्रपट आहेत. त्यापैकी ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या बिग बजेट चित्रपटाचं काम वेगानं सुरू आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी समोर आलं, तेव्हाच या चित्रपटात विकी सुपरहिरो साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच्या भूमिकेचे तपशील कळलेले नसले, तरी चाहत्यांना त्याची उत्सुकता आहे.
- Advertisement -