Home ताज्या बातम्या तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा

तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा

0
तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा

म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईचा एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तलावांत सध्या ९ लाख ३६ हजार ९३३ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी पुढील ८ महिन्यांपर्यंत म्हणजे एप्रिल २०२२ पर्यंत पुरणारे आहे.

मुंबईला मोडकसागर, , अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. त्यावेळी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावर्षी पावसाची जूनमध्ये दमदार सुरूवात झाली मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने फक्त १८ टक्के पाणी शिल्लक होते.

तलावातील घटलेल्या पाणी पातळीमुळे पालिकेने पाणीकपातीचे संकेत दिले होते. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तलावक्षेत्रात होणार्‍या जोरदार पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. तलावक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या धुवांधार पावसामुळे १४ जुलैनंतर फक्त दहा दिवसांत ६ लाख ८५ हजार ८१४ दशलक्ष लिटर म्हणजे तब्बल १८० दिवसांचे पाणी जमा झाले आहे. पाणीपुरवठा करणार्‍या तलावांतील सातपैकी चार याआधीच ओसंडून वाहत आहेत.

Source link