Home मनोरंजन चिपळून, महाड, कोल्हापूर, सांगली ही माझी गावं नाहीत, पण… सुयश टिळकची पोस्ट चर्चेत

चिपळून, महाड, कोल्हापूर, सांगली ही माझी गावं नाहीत, पण… सुयश टिळकची पोस्ट चर्चेत

0
चिपळून, महाड, कोल्हापूर, सांगली ही माझी गावं नाहीत, पण… सुयश टिळकची पोस्ट चर्चेत

[ad_1]

मुंबई: सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत आहे. राज्यभरातून हळूहळू मदतीचा ओघ सुरु आहे. मराठी कलाकारदेखील मदतकार्यात पुढे आले आहेत. मदतीसाठी जनजागृतीदेखील करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता सुयश टिळक देखील शक्य ती सर्व मदक करताना दिसतोय. सोशल मीडियाद्वारे चिपळूण, महाडमधील अनेकांचे फोन नंबर तो मदतीसाठी शेअर करतो. त्यामुळे अनेकांनी त्याला तू इतकी मदत करतो, चिपळूण तुझं गाव आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सुयशनं एक पोस्ट शेअर करत त्याचं उत्तरही दिलं आहे

काय आहे सुयशची पोस्ट?
गेले काही दिवस तुमचे खूप मेसेजेस येत आहेत की,माझं गाव आहे का चिपळूण? गोवा, चिपळून, महाड, कोल्हापूर, सांगली ही माझी गावं नाहीत. पण कधी ना कधी नक्कीच तिथे राहिलो आहे, फिरलो आहे. चार प्रेमाची माणसं जोडली गेली आहेत, कामाच्या निमित्तानं पण जाणं येणं होत असतं. काही मित्र परिवारांची घरं, व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. शून्यातून सगळं पुन्हा उभं करायला त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे.एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!

आणि आत्ता ते माझं गाव आहे की नाही याही पेक्षा माणुसकीच्या नात्याने जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. सध्या ओढावलेल्या पूर परिस्थितीत जितकी मदत तिथे करता येईल तितकी मी करण्याचा प्रयत्न करतोय.’

सोशल पोस्ट

[ad_2]

Source link