Home मनोरंजन भारतीय सैन्याचे शौर्य, बलिदान असा अलौकिक थरार आता मोठ्या पडद्यावर

भारतीय सैन्याचे शौर्य, बलिदान असा अलौकिक थरार आता मोठ्या पडद्यावर

0
भारतीय सैन्याचे शौर्य, बलिदान असा अलौकिक थरार  आता मोठ्या पडद्यावर

[ad_1]

बॉलिवूडच्या पडद्यावर सध्या देशभक्तीवरील सिनेमांची चांगलीच हवा आहे. या सिनेमांना प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं निर्मातेदेखील असे सिनेमे बनवण्यासाठी उत्सुक असतात. अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अजय देवगण पाठोपाठ आता विकी कौशल, कार्तिक आर्यन, सिद्धार्थ मल्होत्रा, हृतिक रोशन, कंगना रणोट आदी कलाकारदेखील देशभक्तीपर सिनेमांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गेल्या काही वर्षांत अजय देवगणनं कॉमेडीचा फॉर्म्युला वापरत ‘गोलमाल’, ‘टोटल धमाल’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे गल्लाभरू सिनेमे केले खरे; मात्र आता त्यानं पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमांवर लक्ष केंद्रित केलं आहे. ‘एलओसी कारगिल’ या सिनेमानंतर पुन्हा एकदा त्याला सैनिकी गणवेशात काम करायचं होतं. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात तो पुन्हा एकदा त्या पेहरावात दिसेल. हा सिनेमा १९७१ च्या युद्धावर आधारित आहे. भारतीय वायूदलाची शौर्यगाथा हा सिनेमा मांडणार आहे.

बहुचर्चित ‘शेरशाह’ हा सिनेमा आता ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कारगिल युद्धात पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत आहे. ‘शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची गाथा या सिनेमात उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना आम्ही देत आहोत.’ असं सिद्धार्थ सांगतो.

भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी बचावकार्यांमधील एक कार्य ‘कॅप्टन इंडिया’ या सिनेमाच्या निमित्तानं पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचं कथानक भारताच्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी बचावकार्यावर आधारित असल्याचं दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सांगितलं आहे. या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशलनंदेखील आणखी दोन देशभक्तीपर कथा असणारे सिनेमे हाती घेतले आहेत. ‘उधम सिंह’, ‘सॅम बहादूर’ या सिनेमांवर सध्या तो काम करतोय. लंडनमध्ये जनरल डायरची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या स्वातंत्रसैनिक उधम सिंह यांच्या भूमिकेत विकी दिसणार आहे. तर दुसरीकडे १९७१ सालचं युद्ध जिंकणाऱ्या फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या चरित्रपटातदेखील तो नायकाच्या भूमिकेत असणार आहे.

गौरवशाली चित्रपट
कंगना रणोट अभिनित ‘तेजस’ या सिनेमात एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. याविषयी कंगना म्हणाली, ‘तेजस या सिनेमात मी वायु सेनेच्या वैमानिकाची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा भाग बनून मी स्वतःला भाग्यवान समजते. प्रत्येक दिवशी आपल्या कर्तव्यात बलिदान करणाऱ्या सैनिकांना ही मानवंदना आहे.’ बॉलिवूडवर देशाभिमानाचा माहोल कायम असताना पुलवामा हल्ला आणि जम्मू-काश्मीर या विषयावरदेखील सिनेमे करण्यात निर्माते उत्सुक असल्याचं समजतं. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल’ हा सिनेमा करत आहेत. तर २६/११ च्या मुंबईतील दहशवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे महापराक्रमी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची जीवनगाथा सांगणारा ‘मेजर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. तसंच हृतिक रोशननं घोषित केलेला ‘फायटर’ हा सिनेमादेखील भारतीय वायुदलाच्या शौर्यावर आधारित असल्याचं कळतंय.

आगामी सिनेमे

  • कॅप्टन इंडिया
  • शेरशाह
  • सॅम बहादूर
  • भुज : द प्राइड ऑफ इंडिया
  • तेजस
  • मेजर
  • फायटर
  • अभिनंदन

[ad_2]

Source link