हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २५८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १२ हजार ६४५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण २५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ५८ हजार ७५१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५४ टक्के एवढे झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मिळणार नऊ लाखांचा निधी: अजित पवार
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ८२ हजार ०८२ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ३४४ इतका आहे. तर, ठाणे जिल्ह्यात ९ हजार ५१० रुग्ण सक्रिय आहेत. तर, ठाण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ८ हजार ७४९ इतके रुग्ण आहेत. सांगलीत ही संख्या ८ हजार ३४८ इतकी आहे. साताऱ्यात ही संख्या ७ हजार २७१ तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या ६ हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अहमदनगरमध्ये ४ हजार ४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ०६९, रत्नागिरीत २ हजार ४९२, सिंधुदुर्गात १ हजार ९२१, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७३० इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७९३ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- पेगॅससप्रकरणी नाना पटोले यांची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले…
यवतमाळमध्ये फक्त ९ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४६७, नांदेडमध्ये ही संख्या ४४० इतकी आहे. जळगावमध्ये ५४०, तसेच अमरावतीत ही संख्या ११४ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९ वर आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- राज्यपालांचे पुस्तक पुरात वाहून गेले की काय!; संजय राऊत यांचा हल्लाबोल
४,९८,९३३ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७१ लाख ७६ हजार ७१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ७६ हजार ०५७ (१३.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ९८ हजार ९३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ४५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.