‘आज तक’ शी बोलताना जावेद हैदर म्हणाला की त्याने बर्याच सिनेमांत आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. लोक त्याला ओळखतात पण लॉकडाउनमध्ये काम नसल्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आपल्या मुलीची शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसल्याचे जावेदने सांगितले. परिस्थिती इतकी बिकट झाली की शाळेने आठवीत शिकणार्या जावेदच्या मुलीला ऑनलाइन वर्गातून काढून टाकले. जावेद यांनी गेल्या काही महिन्यांपासून फी भरण्यास सक्षम नसल्याचे सांगितले. मुलीच्या शाळेची महिन्याची फी २ हजार ५०० रुपये आहे.
जावेद पुढे म्हणाला की, मुलीचं शिक्षण थांबू नये म्हणून त्याने मोठ्या मुश्किलीने शाळेची फी गोळा केली आहे. जावेदने बालकलाकार म्हणून सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली. जावेद म्हणाला की, ‘सिनेसृष्टीत अनेक बडे कलाकार मला ओळखतात. पण मी कधीही कोणाकडे मदत मागायला गेलो नाही. कारण मला पैसे मागायला लाज वाटते.’ जावेदने ‘खुद्दार’, ‘राम जाने’, ‘गुलाम’, ‘दबंग ३’ आणि ‘वॉन्टेड’ अशा बर्याच सिनेमांत काम केले आहे. जावेदने प्रसिद्ध टीव्ही शो ‘जिनी और जूजू’मध्येही काम केले होते.