हायलाइट्स:
- पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला दिलासा नाहीच
- राज कुंद्रा आणि रायन थॉर्पेचा जामिन अर्ज किला कोर्टाने फेटाळला
- राजची सारं लक्ष आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरच
राज कुंद्रानं अॅपमधून किती केली कमाई, मिळाला प्रत्येक पैशाचा हिशोब
राज कुंद्रा याची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर राजच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. राज आणि रायन यांच्या जामिन अर्जावर किला कोर्टात सुनावणी झाली असता त्यांचे अर्ज फेटाळून लावले आहे. राजने मुंबई उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आता उच्च न्यायालय अर्जावर काय सुनावणी देतं याकडे राजचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज कुंद्राला झालेली अटक ही बेकायदा असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत त्याच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राजच्या या याचिकेवर गुरुवारी, २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सध्या राजला ऑर्थर रोड कारागृहात ठेवले आहे.
‘सेलिना जेटलीला राजनं नाही तर शिल्पानं केली होती ऑफर’, अभिनेत्रीच्या प्रवक्त्यानं दिली माहिती
पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा दावा आहे की, पॉर्न फिल्म बनवण्याच्या धंद्याचा राज कुंद्रा मास्टर माईंड आहे. त्याच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. याप्रकऱणी राजच्या व्यतिरीक्त त्याची बायको शिल्पा शेट्टी आणि अन्य काही लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.