क्राइम ब्रांच पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मोबाईल आणि मॅकबुकमधून राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांच्यातील काही चॅट्स मिळाले आहेत. याच चॅट्समध्ये हॉटशॉट्स अॅपमधून झालेली कमाई आणि पेमेंट्सचे डिटेल्स आहे. अश्लील व्हिडिओंचं प्रसारण करणाऱ्या हॉटशॉट्स अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं म्हणणं आहे की, हे अॅप राजच्या बहीणीचा नवरा प्रदीप बख्शी चालवत होता. तो एक ब्रिटिश नागरिक असून तो लंडनमध्ये राहतो. पोलिसांचं म्हणणं आहे की, प्रदीप बख्शी त्याच केनरिन कंपनीचा मालक आहे. ज्याच्या माध्यमातून राज कुंद्रा परदेशात पॉर्न व्हिडिओंचं प्रसारण करत असे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या एका वृत्तानुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या टीमला हॉटशॉट्ससह इतर काही अॅप्सवर अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याचे जवळपास ५ लाख रुपये मिळत होते. पोलिसांनी राज कुंद्राच्या वेगवेगळ्या अकाउंट्समधून तब्बल ७.५ कोटी रुपये फ्रीज केले आहेत.
‘शिल्पा शेट्टीला क्लिन चीट दिलेली नाही’, कधीही होऊ शकते चौकशी
दरम्यान राज कुंद्राच्या या पॉर्नोग्राफी प्रकरणावर न्यायालयीन सुनावणीत त्याच्या वकीलांनी राजवर लावण्यात आलेले कलम चुकीचे असल्याचं सांगत त्याच्या जामिनाची मागणी केली होती. अर्थात न्यायालयानं राज कुंद्राच्या वकीलांचं अपील फेटाळलं असून पुढच्या १४ दिवसांसाठी त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. तसेच राज कुंद्रानं याप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं असून त्याची सुनावणी येत्या २९ जुलैला होणार आहे. सध्या राज कुंद्राला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.