Home शहरे उस्मानाबाद आरोग्य अधिकाऱ्यांवर कोविड केअर केंद्राची जबाबदारी

आरोग्य अधिकाऱ्यांवर कोविड केअर केंद्राची जबाबदारी

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २३ मे : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्याबाबत भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या Management Of Suspect Confirmed Cases of COVID-19 मधील मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी (THO) व वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय (MS) या दोन अधिकारी व त्यांच्या यंत्रणा यांच्यावर वरील कोविड केअर सेंटरच्या यशस्वी संचलनासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये जिल्हयातील 14 ठिकाणी आरोग्य विभागच्या अधिनस्त कोविड केअर सेंटर (CCC) म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने रुग्णांची प्राथमिक तपासणी व त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास तात्काळ पुढील उपचार होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी (THO) व वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय (MS) या दोन अधिकारी व त्यांच्या यंत्रणा यांच्यावर वरील कोविड केअर सेंटरच्या यशस्वी संचलनासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.