हायलाइट्स:
- अमरावतीत घटस्फोटित पत्नीवर तरुणाने केला अत्याचार.
- मुलीला भेटण्याच्या बहाण्याने पश्चिम बंगालमधून आला.
- महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल.
वाचा: नागपूर: नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; तुफान दगडफेक, टोलीतील घटना
शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या या तरुणीची पश्चिम बंगालमधील तरुणासोबत पुण्यातच ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. त्यातून दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. त्यानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली. नंतर महिलेचा पती नोकरीनिमित्त पाटणा येथे गेला. त्यासोबत ही महिला व मुलगीसुद्धा पाटण्यात गेले. दरम्यान, कुटुंबकलहातून या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आपसातील सहमतीने पाटण्याच्या न्यायालयात अर्ज करून घटस्फोटही घेतला. घटस्फोट झाल्यामुळे ही महिला तिच्या मुलीला घेऊन अमरावतीत माहेरी येऊन वास्तव्य करत आहे. शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून ती सेवेत आहे.
वाचा: संधी साधत कैद्याचे घाटीतून पलायन; पोलिसांचे शोध कार्य सुरू
दरम्यान, १५ जून २०१९ रोजी घटस्फोटित पती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अमरावतीत महिलेच्या घरी आला. मुलीची आठवण आली म्हणून आपण मुलीची भेट घेण्यासाठी आलो, असे त्याने महिलेला सांगितले. त्याचवेळी उद्या सकाळी साडेबारा वाजता मला गावी जाण्यासाठी रेल्वे आहे. त्यामुळे रात्रभर याच ठिकाणी मुक्काम करू दे, असे त्याने घटस्फोटित पत्नीला सांगितले. त्यामुळे महिलेने त्याला राहण्यास परवानगी दिली. रात्री जेवण झाल्यानंतर ही महिला तिच्या मुलीसह बेडरूममध्ये झोपली असता घटस्फोटित पती महिलेच्या बेडरूममध्ये जाऊन म्हणाला की, मला झोप येत नसल्यामुळे आपण काही वेळ गप्पा करू, त्यावर महिलेने आपला घटस्फोट झाला असून आपले लग्न संपुष्टात आल्याची आठवण त्याला करून दिली. त्यानंतर त्याने बळजबरीने पीडीत महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी कोणाला काहीही सांगितले तर मुलीला जीवानिशी मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. दरम्यान, १ मे रोजी पीडीत महिलेने आपल्या घटस्फोटित पती विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेल्या तक्रारीवरून घटस्फोटित पतीविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाचा: रेमडेसिवीर: सुजय विखेंचीही कोर्टात धाव; केला हा दावा, इतर नेतेही अडचणीत