हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
- प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला
- तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक – दरेकर
अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर प्रवीण दरेकर यांनी व्हिडिओ ट्वीट केलं आहे. ‘केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा राजकीय सुडापोटी काम करताहेत असा आरोप करणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली आहे. ‘ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती जप्त झालीय याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती. त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे,’ असं ते म्हणाले. ‘कोणत्याही तपास यंत्रणेला मनमानीपणे कारवाई करता येत नाही, असं आमचं म्हणणं होतं. ते खरं ठरलं आहे. भाजप, केंद्र सरकार व तपास यंत्रणेवर आरोप करणाऱ्यांचं आता तरी समाधान होईल. कारण या प्रकरणात तथ्य असल्याचं आता सिद्ध झालं आहे. भविष्यात यामधील एक एक गोष्टी आणि सत्य लोकांसमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
देशमुख यांच्या कोणत्या मालमत्तांवर टाच?
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. त्यात वरळी येथील १.५४ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील २.६७ कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
आणखी वाचा:
शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम पुन्हा गोत्यात
पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज; ‘या’ नेत्याने थेट सांगून टाकले!
उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…