Home ताज्या बातम्या antibodies found children: मुंबईकरांना मोठा दिलासा; ५०% मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

antibodies found children: मुंबईकरांना मोठा दिलासा; ५०% मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

0
antibodies found children: मुंबईकरांना मोठा दिलासा; ५०% मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

मुंबई: राज्यात करोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल असे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना मुंबईकरांसाठी एक दिलासादायक वृत्त हाती आले आहे. ते म्हणजे मुंबईतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आढळून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तिसऱ्या सेरो सर्व्हेक्षणात ही बाब उघड झाली आहे. (coronavirus antibodies have been found in more than 50 per cent of children in mumbai)

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहानमुलांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील एकूण २४ वॉर्डमध्ये मे आणि जून या महिन्यांमध्ये ६ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एकूण १० हजार मुलांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती त्यातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आढळून आली. हे मुंबईकरांसाठी मोठे दिलासादायक वृत्त मानले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- उथळ, अपरिपक्व, बालिश कृत्ये; हसन मुश्रीफ विरोधकांवर बरसले

करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्ज झाली असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत ७ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत एकूण ५ ठिकाणी कोव्हीड सेंटर उभाण्यात आली आहेत. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर २ आणि कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; ओबीसी आरक्षणावरून भाजपचा निशाणा

या पाचही कोव्हीड सेंटर्समध्ये ७० टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तर यात काही विशेष पेडियॉट्रीक वॉर्डही तयार करण्यात येणार आहेत. या पाचपैकी मालाड येथील कोव्हिड सेंटर येत्या आठ दिवसांमध्ये सुरु केले जाईल. ही माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ओबीसी राजकीय आरक्षणावरून जयंत पाटील यांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले…

मालाड कोविड सेंटरमध्ये २१७० बेड उपलब्ध

विशेष म्हणजे मालाड कोव्हिड सेंटरमध्ये एकूण २१७० बेड उपलब्ध आहेत. तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले ही सेंटर्स पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहेत. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आले आहेत. या कोव्हिड सेंटर्समध्ये एकूण ७००० बेड उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे दाखल करण्यात येणाऱ्या मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.

Source link