हायलाइट्स:
- शिवसेना हा पक्ष अभिनिवेश आणि अहंकार या दोन दुर्गुणांनी भरला आहे- भाजप नेते आशीष शेलार.
- धोबीघाट परिसरातील शौचालय उघडायचे नाही आणि स्थानिकांना डावलायचे असे राजकारण सुरू आहे- आशीष शेलार
- दुसऱ्याबाजूला महापौरांना काही बोलायलाही भिती वाटते, बोललो तर त्या आमचा बाप काढतील, अशी टिप्पणी शेलार यांनी केली आहे
धोबीघाट भागातील शौचालयाच्या मुद्यावर भाजप आणि मनसे एकत्र आले आहेत. त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या शौचालयाचे उद्घाटन महापौर पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी १२ जून रोजी केले होते. हे शौचालय चालवण्याची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेअर सोसायटीकडे देण्यात आले होते. भाजप नेते आशीष शेलार यांनी आज या शौचालयाला भेट देत पाहणी केली.
क्लिक करा आणि वाचा- भाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू
धोबी घाटातील हे सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेकडे होते. मात्र नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून ते काढून घेण्यात आले. ही संस्था अल्प दरात ही सुविधा देत होती. असे असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देत आहेत. याबाबत स्थानिकांमध्ये रोष आहे असे आशीष शेलार यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- ‘दोन्ही राजे भाजपच्या मिठाला जागल्यासारखं बोलतात’; खासदार अरविंद सावंत यांचे टीकास्त्र
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: समाजाचा उद्रेक झाल्यास जबाबदार कोण?; उदयनराजेंचा सवाल