हायलाइट्स:
- लग्नाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापणे महागात.
- दीपक सरकटे या तरुणाला पोलिसांनी केली अटक.
- औरंगाबादच्या विश्रांतीनगर भागात घडला प्रकार.
वाचा: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; CM ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश
सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक तरुण त्याच्या पत्नीसह तलवारीने केक कापताना दिसत आहे. तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडिओ निदर्शनास येताच पोलिसांनी सदर तरुणाचा शोध सुरू केला. त्यात सदर व्यक्ती ही विश्रांतीनगर भागातील गल्ली नंबर २ मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दीपक सरकटे (२३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना तलवारीने केक कापल्याची कबुली त्याने दिली. काल १ मे रोजी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता.
वाचा: महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची शक्यता; संजय राऊत म्हणाले…
केक कापल्यानंतर त्याने पलंगाखाली तलवार लपवून ठेवली होती. ही तलवार पोलिसांनी जप्त केली असून दीपक सरकटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवि जाधव, दीपक जाधव, अजय कांबळे यांनी केली.
वाचा: एकाच गावात ४५ घरांची पडझड; ‘या’ जिल्ह्यावर कोसळलं दुहेरी संकट